सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षात आजअखेर ६६ कोटी रुपयांची घरपट्टी वसुली झाली असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली. घरपट्टी आणि पाणीपट्टी हे मनपाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असल्याने उर्वरित काळात वसुली वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वसुली विभागाच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. थकीत कर वसुलीसाठी नियोजनबद्ध मोहीम राबवण्याचे सूचित करण्यात आले. घरपट्टी वसुलीमधून मिळणाऱ्या निधीतून शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि दैनंदिन सेवा पुरवल्या जातात, त्यासाठी वेळेत वसुली होणे गरजेचे आहे.
दरम्यान, नागरिकांच्या करविषयक तक्रारी प्रलंबित राहू नयेत यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दर गुरुवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत तक्रार निवारणासाठी विशेष वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे. या वेळेत संबंधित अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या कर वसुली, थकबाकी किंवा दुरुस्तीशी संबंधित तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निवारण करणार आहेत.
बैठकीस उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी, मनपा उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे यांच्यासह वसुली विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी थकीत कराचा भरणा करून शहराच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगली पोलिस भरतीत एका जागेसाठी 36 जणांची स्पर्धा; 59 पदांसाठी 2,140 उमेदवार पात्र.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










