सांगली : येत्या दोन दिवसांत मुंबईत होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सांगली जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय होणार आहे. सोमवारी मिरजेतील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी अध्यक्षपदासाठी स्पष्ट आग्रह धरल्याने सांगलीतील राजकीय समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेत्यांमध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली.
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ ३० असून महाविकास आघाडीला बहुमतासाठी केवळ एका सदस्याची गरज आहे. दुसरीकडे भाजपकडे जनसुराज्य व रयत क्रांतीसह १८ सदस्य आहेत. स्पष्ट बहुमतासाठी महायुतीला अजून १३ सदस्यांची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ६ आणि शिवसेना (शिंदे गट) चे ७ सदस्य निवडून आल्याने हे दोन्ही गट सध्या ‘किंगमेकर’ भूमिकेत आहेत.
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला संधी द्यावी, या मागणीवर घटक पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतरच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि सभापती पदांवर तडजोड होणार की एखादा गट वेगळी भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मुंबईतील बैठक सांगलीच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










