आटपाडी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या दिघंची येथील पेट्रोल पंपावर इंधन विक्रीच्या मीटर रीडिंगमध्ये फेरफार करून तब्बल 9 लाख 22 हजार 16 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजार समितीचे शशिकांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धीरज रणदिवे, सूरज रणदिवे आणि दादा रणदिवे (सर्व रा. दिघंची) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत संबंधित व्यक्ती पेट्रोल पंपावर कामासाठी होत्या. इंधन विक्रीचे मीटर रीडिंग कमी दाखवून प्रत्यक्ष जमा झालेली रक्कम पूर्णपणे खात्यात न भरता अपहार केल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासात सुमारे 9.22 लाख रुपयांची तफावत आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.
19 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पंपावरील विक्री नोंदी, बँक व्यवहार आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. बाजार समितीच्या मालकीच्या संस्थेतच असा प्रकार घडल्याने परिसरात याबाबत चर्चा रंगली आहे. आटपाडी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा: येलूर फाट्याजवळ कंटेनर उलटला; पुणे–बेंगळुरु महामार्गावर तीन तास वाहतूक कोंडी, शिक्षकांना फटका.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










