आटपाडी : विठलापूर पंचायत समिती गणातून नुकतेच विजयी झालेले तृतीयपंथी सदस्य दिलीप अण्णा हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे आटपाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
अलीकडेच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत विठलापूर पंचायत समिती गणातून त्यांनी २,३११ मताधिक्याने विजय मिळवला होता. तृतीयपंथी समाजातील उमेदवार म्हणून हा विजय सामाजिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.
हेगडे हे बी.ए. पदवीधर होते आणि पंचायत समिती सदस्य म्हणून शिक्षण, आरोग्य व वंचित घटकांच्या प्रश्नांवर काम करण्याची त्यांची भूमिका होती. ते आवळाई गावचे उपसरपंच म्हणूनही कार्यरत होते.
त्यांच्या आकस्मित निधनामुळे स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: पाटगावमध्ये १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










