सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 पेठभाग भाजी मंडई परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिट कामासाठी ₹20 लाख 50 हजार 910 रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामास सुरुवात झाली आहे. स्थानिक विकास निधीतून हे काम हाती घेण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामाची मुदत सहा महिने निश्चित करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांचा दोष दायित्व कालावधी लागू राहणार आहे. संबंधित कामासाठी ‘जनलक्ष्मी मजूर सहकारी मर्या., सांगली’ यांना मक्तेदारी देण्यात आली असून कार्यान्वयनाची जबाबदारी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज यांच्याकडे आहे.
पेठभाग भाजी मंडई परिसरातील व्यापारी व नागरिकांकडून रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रारी येत होत्या. काँक्रिट रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील दैनंदिन वाहतूक अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी १ मार्च रोजी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून काम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आता निर्धारित सहा महिन्यांच्या मुदतीत काम पूर्ण होईल का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










