आटपाडी : तालुक्यातील दिघंची येथे इलेक्ट्रिकल दुकानात झालेल्या चोरीत सुमारे 70 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे समोर आले आहे.
दिघंची येथील ‘अमोल इलेक्ट्रिकल अँड मशिनरी’ या दुकानाची खिडकी फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. 25 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 26 फेब्रुवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चोरीमध्ये 40 किलो वजनाचे गन मेटल बुश, तांब्याचे साहित्य तसेच एल.टी. के. कंपनीचे स्टार्टर असा एकूण 70 हजारांचा माल लंपास करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, याच दुकानात 25 जानेवारी 2026 रोजीही चोरीची घटना घडल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
आटपाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










