विटा : विटा–कराड मार्गावर असणाऱ्या महालक्ष्मी कृषी उद्योग समूहासमोर रविवारी (१ मार्च) सकाळी झालेल्या अपघातात 66 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना मागून आलेल्या एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.
अंकुश तुकाराम नलवडे (वय 66, रा. विटा, ता. खानापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून कराडकडून विट्याकडे येत होते. ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना मागून येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
बसच्या धडकेत नलवडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी विट्यातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
विटा पोलिस ठाण्यात या प्रकरणी संबंधित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: भाजी महाग, चिकन स्वस्त? सांगलीत गवारीच्या दराने ग्राहक हैराण.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










