सांगली : सांगली-मिरज रोडवरील वानलेसवाडी जवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने 62 वर्षीय तात्यासाहेब बाळासाहेब पाटील (वय 62) रा. ताराबाई पार्कजवळ कोल्हापूर, यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तात्यासाहेब पाटील हे भारती हॉस्पिटल ते वानलेसवाडी रोडने चालत चालले असताना वानलेसवाडी जवळील हॉटेल पिंगारा समोर मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली.
त्यानंतर त्यांना तातडीने मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 1 मार्च रोजी पहाटे सुमारे 5.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी संबंधित दुचाकीस्वार सिद्धांत मनोज बनसोडे (रा. पार्शनाथ नगर मिरज) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: ट्रॉलीला ओव्हरटेक करताना मागून एसटीची धडक; विट्यात 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










