सांगली : इस्राईल-इराण तणाव वाढत असताना दुबईला पर्यटनासाठी गेलेल्या कुपवाडमधील सुमारे 30 ते 35 पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
संबंधित नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी संबंधित नागरिकांशी संवाद साधला आहे. पर्यटकांना आवश्यक असल्यास त्वरित मदत उपलब्ध व्हावी यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्यात आल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या तणावामुळे परदेशात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) समन्वय साधला असून संबंधित चौकशी मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत भारतीय दूतावासाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर मिळालेली माहिती संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :
- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली : 0233-2600500
- सांगली पोलीस नियंत्रण कक्ष : 0233-2672100
- मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321587143
आखाती देशांमध्ये नातेवाईक असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा.
हेही वाचा: सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










