सांगली : खानापूर तालुक्यातील बलवडी येथे ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यतीचे (ओपन मैदान) आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत रविवार, 22 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता जाधव मळा, बलवडी-मेंगाणवाडी रोड (खा.) ता. खानापूर. जि. सांगली येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकासाठी 91 हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी 81 हजार, चौथ्या क्रमांकासाठी 71 हजार, पाचव्या क्रमांकासाठी 61 हजार, सहाव्या क्रमांकासाठी 51 हजार आणि सातव्या क्रमांकासाठी 41 हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी 1000 रुपये ठेवण्यात आली असून सहभागींसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी 19 मार्च ते 21 मार्च 2026 या कालावधीत सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.
स्पर्धेतील सर्व गटांचे लॉट 21 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता P3 Live या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह जाहीर करण्यात येणार आहेत.
सरकार ग्रुप, बलवडी (खा.) यांच्या वतीने या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून बैलगाडी मालक आणि शर्यतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क :
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी श्रीधर गायकवाड (7768063849), मनीष गवळी (7020702299) किंवा शुभम कंभार (9503795139) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.
हेही वाचा: सांगलीत टाटा टेक्नॉलॉजीजचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र; विद्यार्थ्यांना उद्योगाधारित कौशल्यांचे प्रशिक्षण.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










