विटा : विटा-कराड मार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 5.30 वाजता क्रुझर (KA-28-M-5805) ही गाडी विटाहून कराडकडे जात होती. हॉटेल डी लाईटजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने गाडीवरील नियंत्रण गमावले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या डांबावर आदळली.
या अपघातात गाडीत प्रवास करणाऱ्या लक्ष्मीबाई हरिबा जमदाडे (रा. गिरगाव, ता. जत) यांच्यासह काही जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी विटा येथील ओमश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
लक्ष्मीबाई जमदाडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना 17 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी हरिबा दशरथ जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रुझर चालक सुनिल पुंडलिक धनवडे (रा. दयाबेरी, ता. जि. विजयपूर, कर्नाटक) याच्याविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
येथे वाचा: Sangli Accident News Today.
हेही वाचा: सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










