सांगली : शहरातील तरुण भारत स्टेडियमसमोरील वैरण अड्डा परिसरात उभी असलेल्या एका ट्रॅव्हल्स बसला पहाटे अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 6.11 वाजता अग्निशमन केंद्राला ट्रॅव्हल्स बसला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने दोन अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत सुमारे एक तास प्रयत्न करून बसमधील आग पूर्णपणे विझवली. या वेळी आग आसपासच्या वाहनांमध्ये किंवा परिसरात पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आली.
दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: म्हैसाळ येथे जनावरांची बेकायदेशीर वाहतूक; टाटा योध्दा गाडीत 5 जनावरे दाटीवाटीने.
- Sangli Travels Bus Fire: सांगलीत पहाटे स्टेडियमसमोर ट्रॅव्हल्स बसला आग; अग्निशमन दलाची तत्परता, तासाभरात आटोक्यात
- म्हैसाळ येथे जनावरांची बेकायदेशीर वाहतूक; टाटा योध्दा गाडीत 5 जनावरे दाटीवाटीने
- नोकरी शोधणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी; सांगलीत 23 मार्चला 300 पेक्षा जास्त पदांसाठी मुलाखती
- मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगलीला निघाले… शिरढोण येथे दुचाकी अपघातात वडिलांचा मृत्यू
- शिराळ्यात मक्याच्या शेतात गांजाची लागवड; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल
- सांगलीत घरगुती गॅसचा गैरवापर सुरूच? सांगली-मिरज-जतसह ४ ठिकाणी तपासणी









