सांगली : कृष्णा व्हॅली शाळेसमोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सिद्राम महादेव सिनगारे (रा. कुपवाड, सांगली) हे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी घडली.
सिनगारे हे सुप्रीम कंपनीमध्ये काम करत असून ते दुचाकीवरून कामावरून घरी येत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास कृष्णा व्हॅली शाळेसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ते दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. अपघातात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि तेथील युवकांनी आयुष हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी ट्रक चालक बाळासाहेब आनंदराव पैठणकर (रा. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध “कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: आटपाडीच्या ‘फुला’ चित्रपटाचा टीजर रिलीज; सुबोध भावे यांच्या आवाजामुळे वाढली उत्सुकता.
- Miraj News : ‘गुरुजी’ म्हणाले गुप्तधन काढतो, मुलाला बरा करतो… मिरजेत महिलेची ३.२२ लाखांची फसवणूक
- Sangli Accident : कृष्णा व्हॅली शाळेसमोर ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
- आटपाडीच्या ‘फुला’ चित्रपटाचा टीजर रिलीज; सुबोध भावे यांच्या आवाजामुळे वाढली उत्सुकता
- सांगलीत गॅस वितरणात बदल; आता OTP पडताळणीनंतरच मिळणार घरपोच सिलिंडर
- Sangli Travels Bus Fire: सांगलीत पहाटे स्टेडियमसमोर ट्रॅव्हल्स बसला आग; अग्निशमन दलाची तत्परता, तासाभरात आटोक्यात
- म्हैसाळ येथे जनावरांची बेकायदेशीर वाहतूक; टाटा योध्दा गाडीत 5 जनावरे दाटीवाटीने









