सांगली : स्मार्ट मिटर मुळे वीज बिल वाढत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत असतानाच अशात आता घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवून २५ वर्षांपर्यंत मोफत वीज मिळवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना’ सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेचा सोलर पॅनल बसवता येणार असून दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकते. विशेष म्हणजे, सोलरमधून अतिरिक्त वीज निर्माण झाल्यास ती महावितरणकडून खरेदी केली जाणार असून नागरिकांना आर्थिक फायदाही होणार आहे.
या योजनेत केंद्र सरकारकडून १ किलोवॅटसाठी ३० हजार, २ किलोवॅटसाठी ६० हजार आणि ३ किलोवॅटपर्यंत कमाल ७८ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तसेच राज्य सरकारकडूनही काही गटांसाठी अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व बीपीएल कुटुंबांना या योजनेतून अधिक लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन, फेसलेस आणि पेपरलेस ठेवण्यात आली असून नागरिकांना घरबसल्या अर्ज करता येणार आहे. इच्छुकांनी https://pmsuryaghar.gov.in/consumer या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी,
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात ३० मार्चपर्यंत जमावबंदी; ५ पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई.
- सांगलीत टपाल जीवन विमा पुन्हा चर्चेत; कमी प्रीमियममध्ये 50 लाखांपर्यंत संरक्षण
- सांगलीत मिळणार 25 वर्षे मोफत वीज? सरकारची नवीन सोलर योजना; किती अनुदान, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
- मिरजेत स्वीकृत नगरसेवक पदावरून चर्चा; बाळासाहेब अस्वले यांना संधी द्यावी अशी मागणी
- Sangli Breaking: सांगली जिल्ह्यात ३० मार्चपर्यंत जमावबंदी; ५ पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई
- सांगली मनपाचा १०६५ कोटींचा अर्थसंकल्प; पाणी, स्वच्छता, लाईट व पर्यावरणासाठी मोठी तरतूद
- Miraj News : ‘गुरुजी’ म्हणाले गुप्तधन काढतो, मुलाला बरा करतो… मिरजेत महिलेची ३.२२ लाखांची फसवणूक









