सांगली : जिल्ह्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. या योजनेमुळे आता मत्स्य व्यवसायातून उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून मच्छिमारांना आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि आर्थिक मदत मिळणार आहे. मासळी उत्पादन वाढवणे, मत्स्यबीज निर्मिती, मासे सुकविण्याची ठिकाणे, कोल्ड स्टोरेज आणि मत्स्यबाजार उभारणी यांसारख्या सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
तसेच जलस्रोतांचा अधिक प्रभावी वापर करून मत्स्यपालनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध विभागांच्या समन्वयातून स्थानिक मच्छिमारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायातून उत्पन्न वाढले अशी अशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा; संगीता पाटील अध्यक्ष तर ऋषिकेश लाड उपाध्यक्ष.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










