विटा : शहरातील शंभर फुटी रोड परिसरात कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या तयारीत उभ्या असलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.
पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खडी क्रशरजवळील चौकात एक तरुण धारदार शस्त्र घेऊन उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
संशयावरून त्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून कोयता जप्त केला. ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव अक्षय सुनील धुमाळ (वय 24, रा. मायाक्कानगर, विटा) असे आहे.
या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: वाळवा तालुक्यात भीषण अपघात; उभ्या ट्रकला मागून आलेल्या ट्रकची जोरदार धडक, चालकाचा मृत्यू.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको

- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार

- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले

- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक

- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा

- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत











