सांगली : शहरातील महिला बचत गटांच्या कामाची दखल थेट दिल्लीत घेण्यात आली असून ‘अमृत मित्र’ कार्यक्रमात सांगलीच्या ७ महिलांचा गौरव करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महिला प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात विविध राज्यांतील महिला बचत गटांसमोर सांगलीतील कामाचा उल्लेख करण्यात आला.
तेजस्विनी आणि समर्थ महिला बचत गटातील शारदा माळी, संगीता मंडले, राजश्री कोरे, वैशाली कोळी, वैशाली सर्वदे, सुलोचना कोळी आणि रेश्मा कांबळे या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे महिलांना देशभरातील बचत गटांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तसेच स्वच्छता, उद्यान देखभाल आणि संबंधित कामांमध्ये व्यवसाय अधिक प्रभावीपणे कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन मिळाले.
महानगरपालिकेच्या पुढाकारातून महिलांना राष्ट्रीय स्तरावर काम सादर करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असून इतर बचत गटांसाठीही ही प्रेरणादायी बाब ठरत आहे.
है वाचा: सांगलीत कंबरेला कोयता लावून फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात; गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










