सांगली : जिल्ह्यातील महिलांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत असून सांगलीत होणाऱ्या विशेष महिला रोजगार मेळाव्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.
हा रोजगार मेळावा सोमवार, 23 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नेमिनाथनगर येथील श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात 300 पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
मिलेनियम मोटर्स, एलआयसी ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, मुथुट मायक्रोफिन, सह्याद्री मोटर्स, आयआयएफएल फायनान्स आदी नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.
दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या 18 ते 50 वयोगटातील महिलांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.
इच्छुक महिला उमेदवारांनी मुलाखतीस जाताना आपली सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत ठेबाव्यात.
हेही वाचा: चरित्र्याच्या संशयावरून लाकडाने मारहाण करून पत्नीची हत्या; पतीविरुद्ध गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










