सांगली : शहरातील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यामुळे शनिवार (21 मार्च) रोजी काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
माधवनगर रस्ता परिसरातील 450 एम.एम. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे समजल्यानंतर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम आज रात्रीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या कामामुळे पाणी साठवणुकीवर परिणाम होणार असल्याने वॉर्ड क्रमांक 9, 10, 11 आणि 12 तसेच खणभाग, गावभाग, वखारभाग, पेठभाग, गणेशनगर आणि डॉ. आंबेडकर नगर या भागांत पाणी कमी दाबाने किंवा मर्यादित स्वरूपात येण्याची शक्यता आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ठिकाणी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, ही दुरुस्ती भविष्यातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वाची असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
हेही वाचा: सांगलीत महिलांसाठी मोठी संधी; 900 महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, 1.62 कोटींचा निधी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










