जत : उमदीजवळ ट्रकने कारला दिलेल्या जोरदार धडकेत कारचालकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
धानाप्पा मल्लाप्पा गुड्डापुरे (वय 45, रा. माडग्याळ, ता. जत) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 29 मार्च रोजी सकाळी देवदर्शनासाठी निघालेल्या इको कारला उमदी-मंगळवेढा रस्त्यावर समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा पुढील भाग चेंगरला गेला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या धानाप्पा गुड्डापुरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी ट्रकचालक शिबु कुमार यादव जि. जमशेद्पुर, झारखंड याच्याविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










