सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सांगलीत एक अनोखी आणि भव्य कलाकृती नागरिकांसाठी खुली करण्यात येत आहे. शिरोळ येथील चित्रकार शुभम शिरीष माने यांनी बाबासाहेबांचे मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट व्यक्तिचित्र साकारले असून हे चित्र पाहण्यासाठी सांगलीकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 6300 खिळे आणि सुमारे 42 हजार मीटर दोऱ्याचा वापर करून हे चित्र तयार करण्यात आले आहे. सुमारे 100 स्क्वेअर फूट आकाराच्या या चित्राचे एकूण वजन अंदाजे 550 किलो आहे.
ही भव्य कलाकृती 14 एप्रिल रोजी प्रथमच नागरिकांसाठी प्रदर्शित होणार असून पुढील 5 दिवस सांगली बस स्थानकाजवळील भीमांगण परिसरात सर्वांसाठी खुली राहणार आहे.
संविधान रक्षक मंडळाच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात नागरिकांना बाबासाहेबांचे अनोख्या पद्धतीने साकारलेले चित्र पाहण्याची संधी मिळणार आहे.
स्थानिक कलाकाराने साकारलेल्या या मोठ्या कलाकृतीमुळे सांगलीच्या सांस्कृतिक अभिमानात भर पडली आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक








