बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Biroba Devsthan Arewadi Tourism Development Plan Approved

सांगली : आरेवाडी येथील प्रसिद्ध श्री बिरोबा देवालय पर्यटन विकासासाठी तब्बल ₹149 कोटी 75 लाखांच्या सुधारित बृहत आराखड्यास जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत हा आराखडा मंजूर करण्यात आला असून पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बिरोबा देवस्थान येथे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. यात्रा काळात सुमारे दीड ते दोन लाख भाविक दोन दिवस मुक्काम करतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटन व पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आराखड्यात डॉरमेटरी भक्त निवास, सामान्य सुविधा केंद्र, प्रशासकीय इमारती, दुकानगाळे, पार्किंग, मुख्य मंदिर दुरुस्ती, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाचे पाणी संकलन, विद्युत व्यवस्था, अग्निशमन प्रणाली आणि भूमी विकास कामांचा समावेश आहे.

यापूर्वी 2010 ते 2018 या कालावधीत सुमारे ₹8 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. तर 2024-25 मध्ये ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र योजनेंतर्गत ₹3.98 कोटींची दोन कामे मंजूर झाली असून त्यांची कार्यवाही सुरू आहे. नवीन आराखड्यामुळे आरेवाडी हे मोठे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा