सांगली : केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आयुष्मान भारत योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीचे अध्यक्षस्थान आयुष्मान भारत हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी भूषवले. यावेळी जिल्ह्यातील हॉस्पिटल्स यादी, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, तसेच योजनांअंतर्गत उपचार प्रक्रियेतील अडचणी आणि सेवा गुणवत्तेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
डॉ. शेटे यांनी सांगितले की, “आरोग्य योजनांचा उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाला स्वस्त व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. त्यासाठी रुग्णालयांमधील अडथळे दूर करणे आणि योजनांविषयी जनजागृती वाढवणे गरजेचे आहे.”
बैठकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार भारत भालके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नारवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गणेश राजमाने, तसेच विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा: ४१ लाखांच्या बोगस दस्तप्रकरणी सहायक निबंधक अमोल डफळे यांच्यावर गुन्हा दाखल.