सांगली : एचआयव्ही संसर्गित आणि नियमित ए.आर.टी. उपचार घेत असलेल्या विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी 1 मार्च 2026 रोजी सांगली येथे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ हॉल येथे हा मेळावा होणार आहे.
एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने वैवाहिक आयुष्याची संधी मिळावी आणि त्यांना योग्य जीवनसाथी मिळावा, या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात एचआयव्हीविषयी जनजागृती मोहीम सुरू असून संसर्ग कसा टाळावा, सुरक्षित जीवनशैली कशी अवलंबावी आणि नियमित उपचारांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. डिसेंबर 2026 पर्यंत जिल्ह्यात एकही नवीन एचआयव्ही संसर्गित रुग्ण आढळू नये हे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, ए.आर.टी. केंद्रे तसेच संबंधित आरोग्य संस्था सहभागी आहेत.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










