Sangli Rain News : जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मिरजपूर्व भागातील अनेक गावांमध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला असून, शिवारात आणि सखल भागात पाणी साचले आहे.
मिरजपूर्व भागात एरंडोली, शिपूर, बेळंकी, लिंगनूर, सलगरे, चाबुकस्वारवाडी या गावांमध्ये दुपारी मुसळधार पाऊस झाला. परवाच्या दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी सातपर्यंत, तसेच काल संध्याकाळपासून पुन्हा सलग मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. गणेशोत्सव काळात पाऊस ओसरला होता, मात्र आता पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे.
दरम्यान, इस्लामपूर भाजी मार्केटचे बांधकाम सुरू असल्याने आठवडा बाजार तात्पुरत्या स्वरूपात अंबिका मंदिर व मठ परिसरात भरवला जातो. मात्र अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे गटारी तुडुंब भरल्या आणि रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. व्यापारी व नागरिकांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
🔴 हेही वाचा 👉 इस्लामपूरात मुसळधार पावसाने आठवडा बाजार उद्ध्वस्त; भाजीपाल्याचे मोठे नुकसान, शेतकरी-व्यापाऱ्यांमध्ये संताप.