Sangli District Teacher Awards 2025 | सांगली : शिक्षकांचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
हा पुरस्कार सोहळा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाभरातून निवड झालेल्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळा सांगलीतील माहेश्वरी गार्डन हॉलमध्ये झाला. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार विशाल दादा पाटील, आमदार इद्रिसभाई नायकवडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.), प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, तसेच माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यास पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि जिल्ह्यातील अन्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्हा परिषदेच्या परंपरेला शोभेल असा हा दिमाखदार सोहळा पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

हेही वाचा: एसटीचा विश्रामबाग कक्ष सुरू; २ नवीन बसेस व ५० गाड्यांना थांबा, विद्यार्थ्यांसाठी पास सुविधा.