Sangli Vishrambag News | सांगली : विश्रामबाग प्रभाग क्रमांक ०९ मधील श्री स्वामी समर्थ मंदिर दिंडोरी प्रणित, शाखा विश्रामबाग येथे बांधण्यात आलेल्या पारायण हॉलचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. या पारायण हॉलसाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून तब्बल ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
हा लोकार्पण सोहळा उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला.
मंदिरे ही फक्त श्रद्धेची नव्हे तर सामाजिक सेवेची केंद्र आहेत. त्यामुळे अशा सभागृहांचे निर्माण समाजजीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत अस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर गीताताई सुतार, उदय माळी, भूपाल सरगर, मंडळाध्यक्ष अमित देसाई, प्रवीण कुलकर्णी, राजू पठाण यांच्यासह श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे पदाधिकारी व सेवेकरी, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण.