Sangli Congress News | सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदाच्या तिढ्याने उग्र रुप धारण केले आहे. माजी नगरसेवक व स्थानिक नेत्यांसह तब्बल सात दावेदार शर्यतीत असल्याने अंतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत.
सात प्रबळ दावेदार
शहराध्यक्षपदासाठी संजय मेंढे, मंगेश चव्हाण, प्रा. सिंकदर जमादार, राजेश नाईक, फिरोज पठाण, मयुर पाटील व अय्याज नायकवडी ही नावे चर्चेत आहेत. यामध्ये “सांगली की मिरज” या जुन्या वादामुळे गटबाजी आणखी ठळक झाली असून काही दावेदार भाजप व राष्ट्रवादी नेत्यांशी गुप्त चर्चा करत असल्याच्या चर्चांमुळे वातावरण अधिक तापले आहे.
निर्णय पुण्यातून
हा तिढा सोडवण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत खासदार विशाल पाटील व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या बैठकीत नवीन शहराध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता आहे. तथापि, अंतिम निर्णयानंतर बंडखोरी व गळतीचे संकट काँग्रेसपुढे उभे राहील, अशी कुजबुज सुरू आहे.
हेही वाचा: भाजपकडून 1 ऑक्टोबरला इशारा सभा; विरोधकांच्या क्लिप दाखवणार, जयंत पाटील यांच्या चौकशीचा इशारा.