Sangli : मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी खासदार विशाल पाटील यांचे मदत संकलन आवाहन

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Sangli MP Vishal Patil Marathwada Flood Relief Appeal

Sangli MP Vishal Patil Marathwada Flood Relief Appeal | सांगली : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हजारो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेकांची घरे, जनावरे आणि शेतीसाहित्य वाहून गेले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल प्रकाशबापू पाटील यांनी सांगलीकरांना मदतीचे आवाहन केले आहे.

खासदार विशाल पाटील म्हणाले की, “पूरामुळे उध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील बांधवांसाठी आज आपली साथ गरजेची आहे. त्यांचे आयुष्य एका क्षणात कोलमडून गेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन मदतीसाठी पुढे यावे.”

पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंमध्ये अन्नधान्य (गहू, तांदूळ, डाळी, पोहे, कडधान्य, तेल, साखर, चहा, मीठ, मसाले), औषधे व प्राथमिक उपचार साहित्य (पॅरासिटामॉल, ORS, सर्दी-पोटदुखीची औषधे), स्वच्छतेसाठी साहित्य (सॅनिटरी पॅड्स, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट), कपडे व इतर वस्त्र, पिण्याचे पाणी व आरोग्य साहित्य, शालेय साहित्य तसेच चप्पल, स्लीपर्स व बिस्किटे यांचा समावेश आहे.

सांगलीकरांनी ही मदत दि. 25 ते 30 सप्टेंबरदरम्यान खासदार विशाल दादा पाटील जनसंपर्क कार्यालय, काँग्रेस कमिटी सांगली येथे जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगली महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची रूपरेषा स्पष्ट.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.