Sangli Today | सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक सांगलीत पार पडली. माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड आणि प्रभागस्तरीय रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
खासदार विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार उभे करण्यावर महाविकास आघाडीचा भर राहणार असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करून आघाडीची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट बैठकीत ठरवण्यात आले. विकासाचे मुद्दे आणि जनतेचा विश्वास या बळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, संजय बजाज, राहुल पवार, हरिदास पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात प्रभागनिहाय बैठकांद्वारे निवडणूक तयारी अधिक गतीने राबवली जाणार असल्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले.
महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून हालचाली तीव्र झाल्या असून, महाविकास आघाडीनेही संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिल्याचे या बैठकीतून स्पष्ट होते.
- Maharashtra Weather: ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा; विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, ‘येलो अलर्ट’ जारी
- सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे बियाणे १००% मोफत; १८ हजार मिनिकीटचे वाटप, महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन
- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार! शासनाकडून ३४४ कोटींचा विशेष निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार ₹१,५००?
- Gold Rate Today: धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात नरमाई; खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे २२K आणि २४K चे ताजे दर (२८ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: हप्ते बंद झालेल्या महिलांना ₹४०,००० मिळणार? इन्स्टाग्रामवरील ‘त्या’ व्हायरल दाव्याचे सत्य समोर; शासनाने जारी केला सतर्कतेचा इशारा
- Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ३०४ तालुक्यांतील दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये थेट खात्यात; राज्य सरकारचा ७,५०० कोटींचा निर्णय, GR जारी









