Sangli News : मिरजेत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, परिसरात काही काळ तणाव

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
मिरजेत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना; गुन्हा दाखल (प्रातिनिधिक छायाचित्र)

Sangli Today | मिरज : मिरज शहरात शुक्रवारी सकाळी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच महापालिका आणि पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून संबंधित प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा आणि पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुतळ्याची तात्काळ स्वच्छता करण्यात आली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

एका तासात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

महापालिका प्रशासनाकडून अवघ्या एका तासात पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या परिसरात कॅमेरे बसवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला. पण आता या घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ पावले उचलून पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.

राजकीय व सामाजिक संघटनांचा निषेध

या घटनेनंतर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोर, शिंदेसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत, माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, माजी नगरसेवक आतहर नायकवडी, आरपीआयचे श्वेतपद्म कांबळे, शिंदसेना शहरप्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सचिव विलास देसाई यांच्यासह अनेक संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिस तपास सुरू

या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; संघटन बळकटीवर भर.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा