सांगली : आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे नैमितिक उद्घोषक (Casual Announcer) निवडीसाठी परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येणार असून, यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2026 आहे, अशी माहिती आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी तेजा दुर्वे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
आकाशवाणी सांगली केंद्र दैनंदिन प्रसारणासाठी उद्घोषकांचे पॅनल तयार करणार असून, या प्रक्रियेत लेखी परीक्षा, स्वर परीक्षा आणि मुलाखत यांच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमित नोकरी न देता, प्रसारणाच्या गरजेनुसार आवश्यक त्या वेळीच नैमितिक उद्घोषक म्हणून कामासाठी बोलावले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी 20 ते 50 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, प्रसारणयोग्य आवाज असावा तसेच तो सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क ₹300 + 18% GST असे एकूण ₹354 इतके आहे. अर्जाचा नमुना तसेच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठीची माहिती आकाशवाणी केंद्र, सांगली (खोली क्र. 25), कोल्हापूर रोड येथे 21 जानेवारी 2026 पर्यंत (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.
या निवड प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी 0233-2332883 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आकाशवाणी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीत FDA ची मोठी कारवाई; ₹1.23 कोटींचा प्रतिबंधित तंबाखू-पानमसाला जप्त, 12 आरोपींवर गुन्हे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










