सांगली : धामणी रोडवरील हसरा चौक रस्ता 17 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 115 व 116 अन्वये निर्गमित केले आहेत.
रस्ता बंद ठेवण्याच्या कालावधीत नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी वाहतूक मार्ग निश्चित केले आहेत. संबंधित अटी व शर्तींच्या अधीन राहून वाहतूक या मार्गांवरून सुरू राहणार आहे.
पर्यायी वाहतूक मार्ग
1) इनाम धामणीहून सांगली शहराकडे येणाऱ्या वाहनांसाठी :
इनाम धामणी → हॉरिझोन्टल हॉस्पिटल → डावीकडे वळून उषःकाल हॉस्पिटल → तक्षशिला रोड → 100 फुटी रोड मार्गे शहरात ये–जा करता येईल.
2) इनाम धामणीहून सांगली शहराकडे जाण्याचा दुसरा मार्ग :
इनाम धामणी → जुना जकात नाका → वसंतराव शिंदे मार्ग → लिमये चौक → स्फूर्ती चौक → एम.एस.ई.बी. रोड मार्गे शहरात ये–जा करता येईल.
3) शांतीबन चौकाकडून इनाम धामणीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी :
शांतीबन चौक → 100 फुटी रोड → डी-मार्ट पुढे डावीकडे वळून → तक्षशिला रोड → उषःकाल हॉस्पिटल → हॉरिझोन्टल हॉस्पिटल → उजवीकडे वळून धामणीकडे जाता येईल.
दरम्यान, नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: आकाशवाणी सांगलीत काम करण्याची संधी; अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जानेवारी.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










