Sangli News : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याची मुदत ३० जानेवारीपर्यंत

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारासाठी प्रवेशिकांची माहिती | फोटो : प्रतिनिधिक - Sangli Today

सांगली : मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका व पुस्तके ३० जानेवारी २०२६ पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. प्रकाशन वर्ष २०२५ मध्ये प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या पुरस्कारासाठी पात्र असणार आहेत.

या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके विचारात घेतली जाणार आहेत. लेखक तसेच प्रकाशक या दोघांनाही या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता अन्य जिल्ह्यातील लेखक व प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) प्रवेशिका व पुस्तके सादर करावीत. मुंबई शहर व उपनगरातील लेखक व प्रकाशकांनी दोन प्रतींसह प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, प्रभादेवी, मुंबई येथे पाठवाव्यात.

या पुरस्काराची नियमावली व प्रवेशिका महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या sahitya.marathi.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. प्रवेशिका पूर्ण भरून आवश्यक साहित्यासह १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. विहित कालमर्यादेनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगली-धामणी रस्ता वाहतुकीसाठी बंद; वापरा ‘हे’ पर्यायी वाहतूक मार्ग.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा