सांगली महापालिकेत भाजप ७२ जागा लढवणार? उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब, आज एबी फॉर्म देण्याची शक्यता

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप किती जागा लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी समोर येत आहेत. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत भाजप ७२ जागा लढविण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यानुसार जनसुराज्यशक्तीला ४ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ला १ जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काल भाजपच्या संभाव्य उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र अनेक इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता दिसून येत असून, काही माजी नगरसेवकांसह सुमारे २० ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कापले गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याचवेळी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी मध्येही हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यात चर्चा सुरू असून, आज या संदर्भातील पुढील निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: ईश्वरपूरजवळ सेप्टिक टँक साफसफाईदरम्यान भीषण दुर्घटना; तिघांचा मृत्यू, पाच जखमी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा