ईश्वरपूर (ता. वाळवा) : वाळवा तालुक्यातील पेठ परिसरात पुणे–बंगळुरू महामार्गालगत असलेल्या एका कंपनीत सेप्टिक टँकची साफसफाई करताना विषारी वायूमुळे गुदमरून तिघा कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (दि. 28 डिसेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
मृत कामगारांची नावे विशाल सुभाष जाधव (26, रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर), सचिन तानाजी चव्हाण (39, रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर) आणि सागर रंगराव माळी (33, रा. गोळेवाडी, पेठ) अशी आहेत. जखमींमध्ये विशाल मारुती चौगुले (24), केशव आनंदा साळुंखे (45), हेमंत शंकर धनवडे (27) आणि सुनील आनंदा पवार (29) यांचा समावेश असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महादेव रामचंद्र कदम (40) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील ड्रेनेज आणि सेप्टिक टँकची साफसफाई सुरू असताना विशाल जाधव हा अचानक टँकमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी सागर माळी आणि सचिन चव्हाण हे तातडीने टँकमध्ये उतरले. मात्र, टँकमध्ये साचलेल्या विषारी वायूमुळे आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे तिघेही गुदमरले. त्यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तिघांना वाचवण्याच्या प्रयत्नात इतर पाच कामगारही टँकमध्ये उतरले होते. त्यांनाही विषारी वायूचा फटका बसल्याने त्यांची प्रकृती खालावली. सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे पेठ, ईश्वरपूर आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सेप्टिक टँक साफसफाईदरम्यान सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ईश्वरपूर पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
हेही वाचा: सांगली मॅरेथॉनमधून मतदान जनजागृती; ३,००० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










