Sangli Breaking News | सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे शोभेच्या दारू (फटाका) निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोट इतका तीव्र होता की भाळवणीसह आजूबाजूच्या तब्बल पाच किलोमीटर परिसरात हादरे बसले, तर अनेक घरांच्या आणि वाहनांच्या काचांना तडे गेले.
या स्फोटात आफताब मन्सूर मुल्ला आणि अमीन मुल्ला हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात आग लागली असून, आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्फोटाच्या आवाजामुळे आणि धक्क्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून अनेकांनी घराबाहेर धाव घेतली.
स्फोट नेमका कशामुळे झाला, कारखान्याकडे आवश्यक परवानगी होती का, तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा: जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील एकत्र; मनपा निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










