सांगली : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025–26 चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा 20, 21 आणि 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू होत आहेत.
महाविद्यालयाच्या अधिकृत माहितीनुसार, या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉलसह विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांसाठी स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली असून, सर्व विद्यार्थ्यांनी शिस्त, संयम आणि क्रीडाभावना राखणे आवश्यक असल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रत्येक सामना 6 षटकांचा असेल, तर व्हॉलीबॉल स्पर्धा 3 सेट्समध्ये खेळवण्यात येणार आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून, नियमभंग अथवा गैरवर्तन आढळल्यास संबंधित संघास अपात्र ठरवले जाऊ शकते.
महाविद्यालयीन जीवनात क्रीडा संस्कृतीला चालना देणे, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा मुख्य उद्देश असल्याचे कॉलेज प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा: मिरज–पंढरपूर महामार्गावर RTO अधिकारी असल्याचे भासवून शेतकऱ्यांची पिळवणुक.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









