आष्टा : खासगी सावकारी प्रकरणातील खटला मागे घेण्याच्या कारणावरून कोरेगाव (ता. वाळवा) येथील एका महिलेला काठीने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी महिलेचे नाव स्मिता जितेंद्र देसाई (वय 39, रा. जैन गल्ली, कोरेगाव) असे आहे. याप्रकरणी मनोज धनपाल कवठेकर (रा. वाळवा) आणि राजीव मधुकर देसाई (रा. कोरेगाव) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 16 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता स्मिता देसाई आपल्या घराच्या जिन्यावरून जात असताना संशयित मनोज कवठेकर याने त्यांना अडवले. फिर्यादीत नमूद केल्यानुसार,
“सावकारीची केस घालून माझे काय बिघडवलेस? खटला मागे घे, नाहीतर तुझ्या पतीला संपवून टाकीन,” अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ करण्यात आली. यानंतर हातातील काठीने स्मिता देसाई यांच्या उजव्या हातावर मारहाण करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे.
याचवेळी दुसरा संशयित राजीव देसाई यानेही “खटला मागे घे, नाहीतर तुझ्या पतीला मागेच संपवले असते” असे म्हणत त्यांना ढकलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच स्मिता देसाई यांचे पती जितेंद्र देसाई यांनाही संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर स्मिता देसाई यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून. आष्टा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025–26 सुरु.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










