Govind Pansare Murder Case Sameer Gaikwad Death | सांगली : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाड याचा आज, २० जानेवारी २०२६ रोजी सांगलीत मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सांगली येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) त्याच्यावर उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
समीर गायकवाड हा १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात झालेल्या कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी होता. उपचारादरम्यान कॉ. पानसरे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या प्रकरणात समीर गायकवाडला २०१५ मध्ये सांगलीतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो अनेक वर्षे कारागृहात होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला जामीन मंजूर झाला होता आणि तो सध्या जामिनावर बाहेर होता. पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात अद्याप सुरू आहे.
हेही वाचा: चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025–26 सुरु.
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- कर्नाटकला कत्तलीसाठी नेत असताना 5 खिल्लार बैलांची सुटका; बोलेरो पिकअपसह कारवाई
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli News: सांगलीतील कॅफे संस्कृती पुन्हा चर्चेत; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर सामाजिक संघटना आक्रमक










