Sangli Politics News : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष “काँग्रेस कार्यकर्ता संवाद दौरा” बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यात काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदम आणि खासदार मा. विशालदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या दौऱ्याचा उद्देश म्हणजे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी रणनिती आखणे आणि जनतेशी असलेला पक्षाचा संवाद अधिक प्रभावी करणे हा आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे
- कवठेमहांकाळ – सकाळी १०:०० वा.
- तासगाव – दुपारी १:०० वा.
- आटपाडी – दुपारी ३:३० वा.
- विटा – सायंकाळी ६:०० वा.
या संवाद दौऱ्यात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
आगामी निवडणुका काँग्रेससाठी निर्णायक मानल्या जात असल्याने हा दौरा पक्षाच्या संघटनात्मक तयारीसाठी हा महत्त्वाच्या टप्पा मानला जात आहे. स्थानिक प्रश्न, गावोगावी असलेले विकासकामांचे मुद्दे आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी थेट सोडवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: सांगली जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळा उत्साहात पार पडला.