सांगली टुडे वृत्तसेवा: दिवाळी, पाडवा आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे हे आपल्या संस्कृतीत अत्यंत शुभ मानले जाते. मात्र, यंदा सोन्या-चांदीच्या दरांनी विक्रमी पातळी गाठल्याने सराफाच्या दुकानात जाऊन तोळे-अर्धा तोळा दागिने खरेदी करणे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटबाहेर गेले आहे. खरतर, आपण दररोज पैसे पाठवण्यासाठी वापरत असलेल्या गुगल पे (Google Pay) वरून अवघ्या १० रुपयात २४ कॅरेट अस्सल सोने खरेदी करता येते, हे आज ९०% स्मार्टफोन वापरकर्त्यांना आधीपासूनच माहिती आहे; पण तरीही त्यातील ९५% लोक याचा प्रत्यक्ष वापर करत नाहीत!
‘मोबाईलवरून खरेदी केलेले सोने सुरक्षित असते का?’, ‘पैसे अडकले तर काय?’, ‘तातडीला लगेच विकून बँकेत रोख रक्कम मिळते का?’ आणि ‘हे सोने हातात कसे मिळवायचे?’ याबाबतच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य नागरिक याबद्दल माहित असूनही या सोयीचा फायदा घेत नाहीत. जर तुमचेही यंदा बजेट कमी असेल, तर परंपरा न मोडता या सुविधेचा खरा फायदा कसा घ्यायचा, हे सविस्तर समजून घ्या.
हेही वाचा: धनत्रयोदशी, दिवाळीला सोने खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम!.
नेमके काय आहे हे डिजिटल सोने (Digital Gold)?
अनेक लोकांच्या मनात अशी शंका येते की मोबाईलवरून सोने खरेदी करणे म्हणजे फसवणूक तर नाही ना? तर तसे अजिबात नाही. गुगल पे स्वतः सोने विकत नाही, तर केंद्र सरकारची उपकंपनी असलेल्या MMTC आणि स्वित्झर्लंडच्या PAMP यांच्या संयुक्त उपक्रमाशी (MMTC-PAMP) गुगलने अधिकृत भागीदारी केली आहे.
तुम्ही गुगल पेवरून जेवढ्या रुपयांचे सोने खरेदी करता, तेवढ्याच वजनाचे ९९.९९% शुद्ध (२४ कॅरेट) प्रत्यक्ष सोने MMTC-PAMP च्या पूर्णपणे विमा संरक्षित (Insured) तिजोरीत तुमच्या नावावर सुरक्षित जमा होते. यासाठी तुम्हाला कोणत्याही बँक लॉकरचे भाडे द्यावे लागत नाही किंवा चोरीची भीतीही बाळगावी लागत नाही.
हेही वाचा: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण! PNG आणि चंदुकाका सराफचे आजचे सोन्याचे दर (३ नोव्हेंबर २०२६).
Google Pay वरून डिजिटल सोने कसे खरेदी करावे? (सोप्या पायऱ्या)
दिवाळीत सोने खरेदी म्हणून किंवा बचतीची सवय म्हणून सोने खरेदी करायचे असल्यास खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:
१. ॲप उघडा: मोबाईलमधील Google Pay ॲप ओपन करा.
२. सर्च करा: वरच्या सर्च बारमध्ये इंग्रजीत ‘Gold Locker’ टाईप करा आणि त्या पर्यायावर क्लिक करा.
३. दर तपासा: स्क्रीनवर तुम्हाला सोन्याचा त्या क्षणाचा खरेदी दर (प्रति मिलीग्राम) दिसेल.
४. ‘Buy’ वर क्लिक करा: खाली दिलेल्या Buy बटणावर क्लिक करा.
५. रक्कम टाका: तुम्हाला जेवढ्या रुपयांचे सोने खरेदी करायचे आहे ती रक्कम टाका (उदा. ₹१०, ₹५०, ₹१०० किंवा ₹५००).
६. पेमेंट पूर्ण करा: तुमच्या नेहमीच्या UPI पिनचा वापर करून पेमेंट पूर्ण करा. पैसे कट होताच तुमच्या ‘Gold Locker’ मध्ये सोन्याचे वजन (मिलीग्राममध्ये) जमा झालेले दिसेल.

जमेल तेव्हा खरेदी करा आणि विकताच एका मिनिटात थेट खात्यात पैसे!
डिजिटल सोन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुमच्यावर कसलेही बंधन नसते:
- सणापासून सुरुवात करा, हव तेव्हा साठवा: या दिवाळीत किंवा धनत्रयोदशीला अवघ्या ₹१०, ₹५० किंवा ₹१०० रुपयांपासून सुरुवात करा. त्यानंतरही तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आणि जेवढे जमेल तेवढ्या पैशांचे थोडे-थोडे सोने विकत घेऊन तुम्ही गुगल पेमध्ये जमा करत राहू शकता. यामुळे घराचा इतर खर्च न बिघडता लहान-सहान बचतीतून सोन्यात पैसे साठतात.
- एका मिनिटात विक्री अन् लगेच बँकेत पैसे: जर भविष्यात अचानक पैशांची गरज पडली, तर सराफाकडे जाण्याची किंवा दागिने गहाण ठेवण्याची गरज नाही. ‘Gold Locker’ उघडून फक्त ‘Sell’ बटनावर क्लिक करा. चालू बाजारभावानुसार एका मिनिटात सोन्याची विक्री होते आणि ते पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात.
- घरपोच डिलिव्हरी: जर तुम्हाला हे सोने प्रत्यक्ष हातात हवे असेल, तर ठरावीक ग्रॅम वजन जमा झाल्यानंतर तुम्ही ‘Delivery’ पर्याय निवडून MMTC-PAMP चे अधिकृत २४ कॅरेटचे सोन्याचे नाणे घरपोच मागवू शकता.
सर्वसामान्यांसाठी याचे थेट फायदे काय?
- घडणावळीचा खर्च नाही (Zero Making Charges): सराफाच्या दुकानात दागिने घेताना १०% ते २०% पर्यंत घडणावळ आणि वेस्टेज द्यावे लागते, डिजिटल सोन्यात हा अतिरिक्त भुर्दंड पूर्णपणे वाचतो.
- चोरीची अजिबात भीती नाही: घरात सोने ठेवल्यास चोरीची भीती असते, तर बँकेत लॉकर भाडे घ्यावे लागते. डिजिटल लॉकरमधील सोने विमा संरक्षित असल्याने पूर्णपणे सुरक्षित असते.
- लहान बचतीची उत्तम सवय: दरमहा पगारातून किंवा आठवड्याला वाचलेले ₹५०-₹१०० गुगल पेमध्ये टाकून तुम्ही हळूहळू सोन्यात पैसे गुंतवू शकता.
हेही वाचा: Bandhkam Kamgar Yojana 2026: बांधकाम कामगारांना १० वस्तूंचा मोफत संच; लाभ कसा मिळवावा? वाचा सविस्तर.
(टीप: डिजिटल सोने खरेदी करताना नियमानुसार ३% जीएसटी (GST) आकारला जातो, तसेच सोन्याच्या दरातील दैनंदिन चढ-उतारांनुसार खरेदी आणि विक्री दरात किंचित फरक असतो.)



