सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेने राजकीय वातावरण तापले आहे. पडळकरांनी केलेल्या या वक्तव्याचा उल्लेख करत विरोधी पक्षांकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, जयंत पाटील यांनी स्वतः कोणतीही शब्दिक प्रतिक्रिया न देता प्रसारमाध्यमांसमोर हात जोडत शांतपणे निघून जाणे पसंत केले.
राजकीय वर्तुळात खळबळ
पडळकरांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा संदर्भ देत टीका केल्याने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना जाब विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील, महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत परंपरा जपली गेली असून, अशा वक्तव्यांनी ती परंपरा भंग पावते, असे मत व्यक्त केले.
स्थानिक प्रतिक्रिया
सांगलीचे खासदार विशाल पाटील म्हणाले की, “सांगलीच्या संस्कृती, परंपरेला अशी वक्तव्ये शोभणारी नाहीत. जिल्ह्यात काही लोकांकडून जी वक्तव्य होत आहेत. त्याच्या मागे कोण आहे. बोलणाऱ्या व्यक्तीला फूस, मोकळीक कोणी दिली, हे पाहायला पाहिजे. अस ते म्हणाले.
पार्श्वभूमी
गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. वारंवार पडळकरांनी केलेल्या आक्षेपार्ह भाषेतील टीकेला पाटील यांनी मात्र प्रतिसाद देण्याच टाळल आहे. या भूमिकेमुळे त्यांच्या शांततेला राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अर्थांनी पाहिल जात आहे.
हेही वाचा: वाळवा तालुक्यात २४ सप्टेंबरला ओबीसी समाजाकडून आरक्षण हक्क मोर्चा.