सांगली : सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिक शहरातील गोदावरी घाट परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक शहरातील रामकुंड व अहिल्या घाट परिसर धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सतराव्या शतकात या परिसराचा पुनर्विकास करून घाट, मंदिरे तसेच दान-धर्माच्या कार्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या कार्यामुळे नाशिक हे संपूर्ण देशातील एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अहिल्या घाट परिसरात होळकर संस्थानाची जमीन उपलब्ध असून, त्या ठिकाणी स्मारक उभारणे योग्य ठरेल, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्य, धर्मसंवर्धन आणि लोककल्याणाच्या योगदानाचे स्मरण जपण्यासाठी नाशिकसारख्या पवित्र नगरीत स्मारक उभारणे महत्त्वाचे ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, २०२७ मध्ये नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून, त्या कालावधीत देश-विदेशातून लाखो भाविक व पर्यटक नाशिकमध्ये दाखल होतील. अशा वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक श्रद्धाळूंना मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव करून देणारे ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांमार्फत पुढील प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच आवश्यक शासकीय निर्णय, निधी व प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार पडळकर यांनी निवेदनात केली आहे. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा असल्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










