Sangli News : श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त नांदेडमध्ये कार्यक्रम; जिल्हाधिकाऱ्यांचे सांगलीकरांना आवाहन

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर फोटो : Sangli Today

सांगली : शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सन १६७५ मध्ये गुरु तेग बहादूर यांनी दिलेले बलिदान अतुलनीय असून त्यांचा त्याग, धैर्य आणि मानवतेसाठीचा संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले. ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांचे योगदान भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड येथे आयोजित या दोन दिवसीय शहिदी समागम कार्यक्रमात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होणार असून, या कार्यक्रमाला उपस्थित राहून सांगलीकरांनी या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी काकडे केले आहे.

हेही वाचा: जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मोतीबागेत ‘कृष्णाकाठचा साहित्य मेळावा’; प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचा सन्मान.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा