Sangli Crime : ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष; वाहतूकदाराची साडेआठ लाखांची फसवणूक; मुकादमावर गुन्हा दाखल

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र – Sangli Today

ईश्वरपूर : ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून ऊस वाहतूकदाराची सुमारे ८ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर जिल्ह्यातील एका मुकादमावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर झाल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश दिनू चव्हाण (वय 44, रा. कामेरी) हे ऊस वाहतूक व्यवसाय करतात. सन 2025–26 च्या ऊस गळीत हंगामासाठी विजापूर जिल्ह्यातील मोहन जयसिंह राठोड (रा. बाराकोटी तांडा, ता. विजापूर) या मुकादमाने त्यांना १२ ऊसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनावर विश्वास ठेवून चव्हाण यांनी १६ जून ते २८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऊस हंगामासाठीची उचल म्हणून रोख व ऑनलाईन माध्यमातून एकूण ८ लाख ४५ हजार रुपये दिले. मात्र, ऊस हंगाम सुरू होऊनही मजूर उपलब्ध करून दिले गेले नाहीत.

पैसे परत मागितल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रमेश चव्हाण यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी मोहन जयसिंह राठोड याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: सांगलीच्या भविष्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विकास संकल्पना; पूरनियंत्रण ते कवलापूर विमानतळापर्यंत मुद्दे मांडले.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा