ईश्वरपूर : पेठ-सांगली मार्गावरील ईश्वरपूर बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात 50 वर्षीय पादचारी ध्रुवकुमार मधुकर कदम (रा. मसुचीवाडी) यांचा मृत्यू झाला. ते दिव्यांग असून पेन्शन काढण्यासाठी ईश्वरपूरला आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुवकुमार कदम हे बसस्थानकातून बाहेर पडून बँकेकडे चालत जात असताना पेठकडून येणाऱ्या दुचाकीने (एमएच 10 एटी 5767) त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत ते रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या अपघातात दुचाकी चालक संग्राम रामदास पाटील (वय 24, रा. बुधगाव, ता. मिरज) हाही गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दुपारी ध्रुवकुमार कदम यांचा मृत्यू झाला.
कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ईश्वरपूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा: २५० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; राजवाड्यात खोकी हटवण्यावरून महापालिका-व्यावसायिक आमनेसामने.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










