सांगली : शहराच्या मध्यभागी असलेल्या राजवाडा चौकात शनिवारी अतिक्रमण हटवण्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक खोकी हटवण्यासाठी राजवाडा चौकात दाखल झाले; मात्र संबंधित जागा गणपती पंचायतन संस्थानची खासगी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कारवाई थांबवण्यात आली.
राजवाडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून स्टॅम्प विक्रेते, टायपिस्ट, झेरॉक्स, चहा-नाष्टा व्यावसायिक तसेच दस्त नोंदणीशी संबंधित सेवा देणारे व्यवसाय सुरू आहेत. या छोट्या व्यवसायांमधून सुमारे २५० ते ३०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, असे स्थानिक व्यवसायिकांनी सांगितले.
अतिक्रमण हटवण्यासाठी शनिवारी सकाळी महापालिकेचे पथक येथे पोहोचले. मात्र खोकी ज्या जागेवर आहेत ती गणपती पंचायतन संस्थानाची खासगी मालमत्ता असून संबंधितांना भाडेपट्टीवर जागा देण्यात आल्याचे पंचायतन व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पंचायतनचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी संबंधित जागा पंचायतनच्या खासगी मालकीची असल्याचे स्पष्ट केल्यानंतर महापालिका पथकाने कारवाई स्थगित करत माघार घेतली. या घटनेनंतर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली असून, खासगी मालमत्ता आणि सार्वजनिक अतिक्रमण याबाबत स्पष्ट निकष काय आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा: 18 लाखांचे द्राक्षे नेले, 11 लाख बुडवले; बेडगच्या द्राक्ष बागायतदाराची व्यापाऱ्याकडून फसवणूक.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










