सांगली : कवठेमहांकाळ परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने कारवाई करत 2 किलो 882 ग्रॅम गांजा जप्त केला असून एका युवकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान उस्मान सनदे (वय 32, रा. झुरेवाडी रोड, कवठेमहांकाळ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून 72 हजार 50 रुपये किमतीचा गांजा तसेच एमएच 10-7175 क्रमांकाची दुचाकी असा एकूण 3 लाख 2 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयित आरोपी दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
प्राथमिक तपासात आरोपीने जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरातील समीर नकाशे याच्याकडून गांजा खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सोमनाथ गुंडे यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर पुढील तपास करत आहेत.
येथे वाचा: Crime News Sangli.
हेही वाचा: सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस.
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस
- सांगलीत टाटा टेक्नॉलॉजीजचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र; विद्यार्थ्यांना उद्योगाधारित कौशल्यांचे प्रशिक्षण
- सांगलीत एचआयव्हीबाधितांसाठी वधू-वर परिचय मेळावा; महाराष्ट्र-कर्नाटकातून 153 उमेदवारांची नोंदणी
- जत तालुक्यात महसूल समाधान शिबिर; 7/12 दुरुस्तीपासून पीएम किसान योजना नोंदणीपर्यंत 15 सेवा एकाच ठिकाणी
- दोन वर्षांपूर्वीच्या वादातून मिरजेत कोयत्याने दुकानाची तोडफोड; सराईत गुन्हेगारास अटक









