Kavathemahankal Special 26 Mastermind Arrested | कवठेमहांकाळ : आयकर विभागाचा अधिकारी असल्याचा बनाव करून गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जे. डी. म्हेत्रे यांना तब्बल १ कोटी २० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
आरोपी महेश रघुनाथ शिंदे (वय ४७, रा. घाटकोपर, मुंबई – मूळ रा. जयसिंगपूर) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला गुरुवार २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
१४ सप्टेंबर रोजी रात्री डॉ. म्हेत्रे यांच्या घरी एका महिलेसह चौघांनी आयकर अधिकारी असल्याच्या नावाखाली प्रवेश केला होता. घराची झडती घेत त्यांनी १ किलो ४१० ग्रॅम सोने आणि १५ लाख ६० हजार रुपये रोख असा ऐवज लुटला होता.
या प्रकरणी यापूर्वी पाच जणांना अटक झाली असून काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. मात्र या संपूर्ण गुन्ह्याचा सूत्रधार महेश शिंदे गेल्या काही दिवसांपासून फरार होता. विशेष पथकाने केलेल्या कारवाईत अखेर तो जेरबंद झाला.
हेही वाचा: विटा येथे “जागर आदिशक्तीचा – 2025” महिला स्पर्धांचे आयोजन.